Sunday, July 7, 2024

Latest Posts

बारामतीत ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ सामना होणार ? Sharad pawar यांचा नातू राजकारणात येण्याच्या तयारीत

आता युगेंद्र पवार मैदानात उतरल्याने काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळू शकते त्यामुळे बारामतीत दादा विरुद्ध दादा अशी लढत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुक ही महाविकास आघाडी आणि महायुतीमुळे गाजली जरी असली तरी लोकसभा ही ‘बारामती’ मतदारसंघामुळे अधिक जास्त रंगली कारण,महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच ‘पवार’कुटुंब आमनेसामने आलं. काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगला खरा पण त्यात पुतण्याच्या पदरात अपयश आलं. शरद पवारांनी (Sharad pawar)स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit pawar)यांनी खंबीरपणे साथ दिली पण काकांची साथ सोडून अजित पवार हे सत्तेत सामील झाले आणि ‘पवार’विरुद्ध ‘पॉवर’असा खेळ राज्याच्या राजकारणात सुरु झाला. १८व्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती सारख्या मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार (Suntra pawar)यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या विरोधात शरद पवारांची(Sharad pawar) लेक सुप्रिया सुळे (Supriya sule) उभी असल्याने बारामतीकरांची साथ ही शरद पवारांना मिळाल्याचं दिसल. पण आता पुन्हा एकदा बारामतीकरांनी चक्क ‘दादा’बदलण्याची मागणी केली आहे.

शरद पवारांनी बारामती किल्ल्यावर राज्य मिळवल्यानंतर आता विधानसभा आणि परिषदेची जय्यत तयारी सुरु झाली. अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर पवार कुटुंबात फूट पडली. रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी शरद पवारांची साथ देणं ठरवलं आणि त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरु आहे. अशातच ११ जून रोजी युगेंद्र पवार यांनी जनता दरबार ठेवला होता.त्यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी (Sharad pawar) युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला उपस्थिती लावली.युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेत त्यांना एका पत्रद्वारे मागणी घातली. “आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे.त्यांना विधानसभेसाठी बारामतीतून उमेदवारी द्यावी”अशी मागणी केली.

युगेंद्र पवार कोण आहे ?

युगेंद्र पवार (yugrendra pawar) अजित पवारांचे बंधु श्रीनिवास पवार यांचा मुलगा आहे. फुटाफुटीच्या  राजकारणात त्यांनी शरद पवारांची साथ देण्याचं ठरवलं. लोकसभेत शरद पवारांसोबत त्यांनी सक्रिय पणे काम केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात युगेंद्र पवार सक्रिय होते त्यामुळे बारामतीच्या यशात युगेंद्र पवारांचा देखील मोठा वाटा आहे.

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्व पक्षीयांकडून तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. लोकसभेत सुप्रियासुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला आणि लोकसभेप्रमाणेच विधानसभेत तसचं चित्र दिसण्याची शक्यता आहे.लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होती पण आता युगेंद्र पवार मैदानात उतरल्याने काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळू शकते त्यामुळे बारामतीत दादा विरुद्ध दादा अशी लढत होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अखेर प्रतीक्षा संपली!, Xiaomi 14 Civi हा शानदार फोन उद्या होणार लॉन्च

Kota Factory Season 3 चा आज होणार Trailer प्रदर्शित, जाणून घ्या – तुम्हाला तो कधी आणि कुठे पाहता येईल?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss