Wednesday, July 3, 2024

Latest Posts

क्रिकेट क्लबला पारदर्शकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, Nana Patole यांची ग्वाही

MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे ९ जूनला अमेरिकेत निधन झाले. त्यामुळे २३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मिलिंद नार्वेकर, संजय नाईक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू असताना आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने अध्यक्षपदासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळाले. या कॅांग्रेसनेत्याला शरद पवार-आशिष शेलार मदत करणार की मविआमध्ये मीठाचा खडा पडणार हे २३ तारखेनंतर कळू शकेल, असे चित्र दिसत असताना आता नाना पटोले यांनी आता त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून पत्रक जारी करत आभार व्यक्त केले आहेत. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री कॅांग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्यानंतर राज्यातील सगळ्यात प्रभावी नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले MCA अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथ मुंडे, पृथ्वीराज चव्हाण यांना MCA मध्ये आणणाऱ्या कॅांग्रेसच्या शाह आलम यांनीच प्रदेशाध्यक्ष पटोलेंसाठी पीच बनवले आहे. ही निवडणूक २३ जुलै रोजी होणार आहे.

मला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी माझगाव क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. यापूर्वी मा. मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, कै. गोपीनाथ मुंडे, मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांनी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. तीच संधी आज मला मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझगाव क्रिकेट क्लब आणि समस्त क्रिकेट प्रेमींना आश्वासन देतो की, मी क्रिकेटसोबतच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुण खेळाडूंच्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

Image

माझगांव क्रिकेट क्लबच्या कार्यकारिणीने माझ्या नावाचा सर्व संमतीने ठराव पारीत करुन माझी माझगांव क्रिकेट क्लबच्या अध्यक्ष पदी निवड केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रतिनिधीत्व करण्याचे मला अधिकार प्रदान करण्यात केलेले आहे. यासाठी मी माझगांव क्रिकेट क्लब कार्यकारिणी व खेळाडूंचा आभारी आहे. माझी निवड केल्याबद्दल मी माझगांव क्रिकेट क्लबला पारदर्शकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि क्रिकेट खेळाचे महत्व महाराष्ट्रामध्ये अधिक जोमाने वाढविण्याचा प्रयत्न करेल अशी मी ग्वाही देतो, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकातून म्हटले आहे.

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss