spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सर्वसामान्य महिला उतरल्या रस्त्यावर

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाईचा गगनाला भिडत आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे 55 रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

ठाणे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाईचा गगनाला भिडत आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे 55 रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीविरोधात ठाण्यातील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेसचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार व ठाणे – पालघर विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

देशातील मोदी सरकार अर्थव्यवस्थेची घट रोखण्यात आणि बेरोजगारीला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. आपल्या देशात ही गती मंदावली आहे. केंद्र सरकारची चुकीची आर्थिक धोरणे याला कारणीभूत ठरत आहेत. असा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा :

‘धर्मवीर’साठी प्रसाद ओक ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर उलटा ठेवून तसेच चुलीवर अन्न शिजवून मोदी सरकारचा निषेध केला. मोदी सरकारचा निषेध, मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल; सस्ती दारू महंगा तेल अशा जोरदार घोषणा दिल्या.
या प्रसंगी ऋता आव्हाड यांनी, जगभरात देशाची ओळख ही अर्थव्यवस्थेच्या वाढीने अधोरेखित होत असते.

अर्थव्यवस्था मजबूत असेल तर देशाची प्रगतीकडे वाटलाच सुरू राहते, उत्पादन व रोजगार निर्मिती प्रक्रिया सुरु राहते. पण, मोदी सरकारला याच्याशी काही देणेघेणे नाही. आज घरगुती गॅस सिलिंडरचे दर अकराशे रूपयांच्या घरात गेली आहे. एकूणच भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू झाली आहे, अशी टीका केली.

जागतिक वारसा मिळालेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाला आज 18 वर्षेपूर्ण

Latest Posts

Don't Miss