spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोनाच्या अधिक घातक नव्या व्हेरिएंटची चाहूल, आरोग्य विभागाचा इशारा

जागतिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोनाचा नवा अधिक घातक व्हेरिएंट पसरू लागला आहे. शिवाय युरोपातही हिवाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार पसरू लागले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहून काळजी घ्यावी लागणार आहे, असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, …हा तर शुभशकुन

राज्यामध्ये स्वाईन फ्लूची वाढणारी रुग्णसंख्या हीदेखील गंभीर बाब आहे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. इन्फ्लुएन्झा, सारी, अशा श्वसनाच्या आजारांबाबतही आरोग्य विभागाने इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोणताही संसर्ग झाल्यास लोकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार सुरू करावेत.

हेही वाचा : 

Elnaaz Norouzi : इराण महिलांच्या समर्थनार्थ बॉलीवूड अभिनेत्री एलनाज नोरोजीने काढले कपडे,शेअर केला व्हिडिओ

कोरोना ची साथ कमी होत असतानाच स्वाईन फ्लूच्या साथीने जोर धरला होता. गेल्या दहा महिन्यात राज्यात ३ हजार ५८५ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात अधिक ४६ मृत्यू हे पुणे जिल्ह्यात आहे तर मुंबई या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आजराने प्रमाणेच स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. या मध्ये सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजारात ताप, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश आहे.

राशी भविष्य १२ ऑक्टोंबर २०२२, तुमच्या जवळ आज पैसा आणि मनःशांती एकत्र नांदतील

Latest Posts

Don't Miss