Worli Hit and Run Case: गृहमंत्री Devendra Fadnavis ‘युजलेस’! महिलेचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचला नाही का?: Sanjay Raut

Worli Hit and Run Case: गृहमंत्री Devendra Fadnavis ‘युजलेस’! महिलेचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचला नाही का?: Sanjay Raut

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणावरून आता राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला मंगळवार (९ जुलै) विरार येथून अटक केली होती. काल (बुधवार, १० जुलै) कोर्टाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता, शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (गुरुवार, ११ जुलै) पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘युजलेस’ म्हणून उल्लेख केलाय आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि गृहमंत्री यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी अपघातातील मृत कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, “जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचं कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या १० लाखांना किंमत नाही. त्यांचा जीव १० लाखांचा आहे का? असं काय झालं कि, मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत? ती महिला काय खोकेवाल्याला आमदाराची बायको आहे? कि खोकेवाले आहेत ते? आले कि पैसे वाटायचे? याला वाट त्याला वाट… कायदा – सुव्यवस्था नष्ट झाली आहे या राज्यात… मी व्यक्तिगत म्हणत नाही पण राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत. आतापर्यंत एवढी भीषण दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली पण गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन नाही तर संवेदनापण नाही..”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हे काय चाललंय? चेंगराचेंगरी झाली, अपघात झाला, खून झाला तर लाखो रुपये दिले…. हे काय पैशाचं राजकारण सुरु झालय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा तुम्ही केली. मुंबईच्या रस्त्यावर कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. ज्यांच्या मुलाने हे केलं. तो एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय आहे. निर्दयीपणे कावेरी नाखवा यांना चिरडलं गेलं. ती तुमची लाडकी बहीण नाही का? कुठे आहेत गृहमंत्री? या राज्याला गृहमंत्री आहेत कि नाही? शांत का बसलेत? महिलेचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचला नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पायाभूत प्रकल्पांची कामे करताना नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घेण्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version