spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यामधील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी बेमुदत संपावर

जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाचा सलग सातवा दिवस सुरु आहे त्यामुळे नागरिकांची बरीच कामे झाली नाहीत त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाचा सलग सातवा दिवस सुरु आहे त्यामुळे नागरिकांची बरीच कामे झाली नाहीत त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. जुन्या पेन्शन मागणीसाठी महाराष्ट्रामधील तहसीलदार, नायब तहसीलदार, उप जिल्हाधिकारी 27 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांनी संपावर जात असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या पंचनाम्याची प्रक्रिया लांबणीवर होण्याची शक्यता आहे.

रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. नायब तहसीलदारांची राजपत्री मागणी मान्य झाली नाही तर सर्व कर्मचारी ३ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तहसीलदार संघटनेने घेतला आहे. या काळामध्ये कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक का करणार असल्याचे महाराष्ट्र तहसीलदार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य सचिवाला या संदर्भामध्ये पत्र लिहून संपावर जात असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे तीन एप्रिलनंतर नुकसान भरपाईचे पंचनाम्याची प्रक्रिया व शेतकऱ्यांना मदत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

  • मागण्या मान्य न झाल्यास ३ जुलैपासून संघटनेचे नियोजित बेमुदत कामकाज बंद आंदोलन देखील सुरु राहणार.
  • तहसीलदार आणि नायब तहसीलदार २७ मार्चपासून लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेणार आहेत.
  • राज्यभरामधील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेले असून आज या संपाचा सातवा दिवस आहे या मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे, या आठवड्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळामध्ये विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
  • कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती संदर्भातील कामे पार पडणार हे दोन विषय वगळता इतर कोणतेही आंदोलन लेखणी आंदोलनदरम्यान पार पडणार नाही.

२० मार्च रोजी सर्व कर्मचारी कार्यालयासमोर, शाळेसमोर दुपारी १२ ते १२.३० या वेळेमध्ये गगनभेदी थाळी नाद करून राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेला धिक्कार करणार आहेत.

२३ मार्च रोजी कला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी जिल्हानिहाय कर्मचारी शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. घोषणांच्या निनादात निदर्शने करण्यात येणार आहेत.

२४ मार्च रोजी माझे कुटूंब माझी पेन्शन हे अभियान करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हा न्याय कर्मचारी शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करणार आहेत.

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss