spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे थैमान, तर मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव

मुंबईतील १६व्या जीनोम सिक्वेन्स सिरीजमध्ये चाचणी केलेल्या सर्व २३४स्वॅब नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये ३६ किंवा १५टक्के सह XBB प्रकार समाविष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की २३५ नमुन्यांपैकी १४ टक्के किंवा ३३ नमुने XBB.१ उप-प्रकाराने संक्रमित असल्याचे आढळले.

चंद्रकांत खैरेच्या पक्ष फोडी वक्तव्यांवर नाना पाटोल्याचं प्रतिउत्तर

‘कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता’, WHO कडून धोक्याचा इशारा

सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे (Corona New Variant) चिंता वाढली आहे. शास्त्रज्ञांनी पुन्हा कोरोनाची नवीन लाट (Corona Wave) येण्याचा धोका व्यक्त केला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामधील (Omicron) नवीन XBB व्हेरियंटमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत.

हेही वाचा : 

न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात

कोणता प्रकार अधिक धोकादायक आहे?

हा अधिक संसर्गजन्य आहे, पण ओमायक्रॉन आणि त्याच्या सबव्हेरियंटची लक्षणे अतिशय सौम्य आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र आरोग्यतज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नव्या व्हेरियंटपासून सावध राहण्याची आणि अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ओमायक्रॉनच्या XBB प्रकाराची लक्षणे सौम्य आहेत, परंतु या विषाणू अधिक संसर्गजन्य आहे, यामुळे कोरोनाची रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

चीनमध्ये ४०४५ नवे कोरोना रुग्ण

चीनमध्ये ४ हजार ४५ नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. एक दिवस आधी काल ३ हजार ८३७ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली होती. नव्याने आढळलेल्या ४०४५ रुग्णांपैकी ६५७ रुग्ण लक्षणे असलेले आणि ३,१८० लक्षणे नसलेले आहेत.

Red Chilli : लाल मिरची महागणार! मिरची राजधानी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या पाकिस्तानला मोठा फटका

Latest Posts

Don't Miss