नाशिकमध्ये आज घाटमाथा परिसरामध्ये येलो अलर्ट

राज्यामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात मान्सूनच्या सरी कोसळत असून मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

नाशिकमध्ये आज घाटमाथा परिसरामध्ये येलो अलर्ट

राज्यामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात मान्सूनच्या सरी कोसळत असून मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरामध्ये पावसाची शक्यता गृहीत धरून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. परंतु उद्या नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना गती मिळाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट असून आजही यलो अलर्ट (Orange Alert) असून सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शिवाय खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यात त्रस्त झालेल्या नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. २६ जून शहरामधील काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे. परंतु अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.

राज्यामध्ये अनेक जिल्यामध्ये पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. शहरात पाऊस होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आज राज्यात हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version