spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Yogesh Kadam Accident, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात

शिंदे गटाचे आमदार योगेश रामदास कदम (Yogesh Ramdas Kadam) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. योगेश कदम (Yogesh Kadam) हे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते शिंदे गटाचे आमदारही आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात हा रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर (Poladpur) जवळील कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला एका डंपरने धडक दिली आणि त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह चालक आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर आमदार योगेश कदम हे सुदैवाने या बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने आमदार योगेश कदम (Yogesh Kadam)अपघातानंतर सुखरूप आहेत. पण या अपघातात त्यांच्या चालकाला (Driver) किरकोळ दुखापत झाली असून अपघातानंतर चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत.आमदार योगेश कदम यांच्या कारच्या अपघात पूर्वी ते त्यांचा निवासस्थानी गेले होते. योगेश कदम यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश झाला होता. त्यानंतर योगेश कदम (Yogesh Kadam) हे मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले. मुंबईकडे येत असताना काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास पोलादपूर (Poladpur) जवळील कशेडी घाटात आमदार कदम यांच्या करला एका भरधाव डंपरने धडक दिली . यामुळे योगेश कदम यांच्या कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आणि त्याच बरोबर कारमध्ये असलेल्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत.

या अपघातात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) हे किरकोळ जखमी झाले आहेत. आमदार योगेश कदम यांनी अपघातानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते सुखरूप असल्याची माहिती पुरवली आहे. आणि त्यांच्या सह त्याचे सर्व सहकारी सुद्धा सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका मोठ्या अपघातातून ते वाचले असल्याचे त्यांनी प्रतिक्रियेत सांगिले आहे . त्यांचे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेत आहेत ? पहा त्याचे दुष्परिणाम

कशी बनवावी घरगुती Veg Frankie ?

Bigg Boss 16 एमसी स्टॅन आणि अर्चना गौतमवर सलमान खान संतापला : म्हणाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss