spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बुलडाण्यात एसटी अपघातात तरुणाने गमावले हात

बुलडाण्यामधून (Buldana) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुलढाण्यामध्ये एका परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांने त्यांचे हात गमावले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव (Malkapur-Pimpalgaon) मार्गावरील एसटी बसचा तुटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने आज सकाळी ६ वाजता आव्हा गावाजवळ हि घटना घडल्याचे समोर येत आहे. यामध्ये जखमी झालेल्यांचे नाव परमेश्वर सुरडकर (Parmeshwar Suradkar) आणि विकास गजानन पांडे (Vikas Gajanan Pande) असे आहे.

यामध्ये ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर सुरडकर यांचा हात कापला गेला. त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये विकास गजानन पांडे (२२ वर्ष) याचा समावेश आहे. त्याचाही हात कापून धडावेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीचा सराव करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता. ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर असतानाच पोलीस प्रवेश परीक्षेसाठी सराव करणारे काही तरुण मॉर्निंगवॉकला जाताना हाताचे व्यायम करत रस्त्याच्या बाजूने संथ गतीने धावत होते. त्याचवेळी ही बस बाजूने गेली आणि दोन तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांपैकी एकाचा हात अगदी तुटून खाली पडल्याची माहिती मिळत आहे.

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

परिमंडळ एस.टी बस सेवा यामध्ये जखमी झालेल्या सर्व तरुणांच्या रुग्णालयाचे खर्च करणार आहेत अशी माहित मिळत आहे. पण एक बसच्या पत्र्याने मुलांचं आयुष्य बिकट करून ठेवले आहे. या घटने नंतर सांगली कडून एसटीबस सेवा वर जोरदार टीका केली जात आहे. जर बसचा पत्रा भर निघाला आहे तर चालकाने किंवा एसटी ने याची दाखल का घेतली नाही. दोषींन वर त्वरित कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे.

हे ही वाचा:

Rain Alert : राज्यभर मुसळधार पाऊस, तर पुढील ३ ते ४ तास मुंबईकरांसाठी सतर्कतेचे

पुण्यात आयोजित केलं अजब ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर,हिंदू महासभेचा विरोध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss