spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबादची युट्युबर बिंदास काव्या अखेर सापडली

यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली.

यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली. यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता असल्याची बातमी पसरली होती. औरंगाबादमधील युट्यूबर बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातील ईटारसीमध्ये सापडली आहे. याबाबत तिच्या आई वडिलांनी माहीती दिली आहे. बेपत्ता असलेली औरंगाबादची युट्युबर बिंदास काव्या (Bindas Kavya) अखेर सापडली आहे. बिंदास काव्या ही मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) ईटारसीमध्ये पोलिसांना सापडली आहे.

बिंदास काव्या बेपत्ता झाल्याने औरंगाबादमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी काव्याचा शोध लावला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काव्या पोलिसांना मनमाडहून (manamad) लखनौला जात असताना मिळाली आहे. यूट्युबर बिंदास काव्या काल दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची दाखल करण्यात आली होती. मनमाडहून (manamad) लखनौला जात असताना पोलिसांनी काव्याला ताब्यात घेतले.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पाठपुरावा केल्याने आणि आरपीएफच्या मदतीने या युट्युबराला शोधण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्थानिक पोलीस , सायबर, गुनहे शाखा यांना या मुलीचा तात्काळ शोध घेण्य्याचे आदेश दिले. मुलीच्या पालकांनी दिलेले माहीती आणि सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने तपास केल्यानंतर ती महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशकडून खूप वेगाने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती रेल्वेने प्रवास करत असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यानुसार तपास करून रेल्वे विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. यावेळी तिला शोधण्यास आरपीएफला यश मिळाले. काव्या ही रेल्वेने तिच्या लखनऊ येथील मित्राकडे जात होती. खुशीनगर एक्सप्रेस गाडीधून तिने खांडवा रेल्वे स्टेशन पास करून पुढे गेल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलीस तिला घेऊन औरंगाबादकडे येत आहेत.

यूट्युबर बिंदास काव्या ही कालपासून गायब होती. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे अखेर छावणी पोलिसात याप्रकरणी मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात आला. शोध सुरू असतानाच ती मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) ईटारसीमध्ये पोलिसांना सापडली.

हे ही वाचा :

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ठरले ब्रिटनचे नवे राजा

ब्रम्हासत्रमधील दीपिकाचा कॅमिओमुळे ब्रम्हासत्र भाग २: देव साठी चाहत्यांची उत्सुकता पोहोचली शिगेला

ब्रह्मास्त्राची कमाई हि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक सुखद धक्काच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss