spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kajol Birthday: वयाच्या १६ व्या वर्षापासून ते ४८ व्या वाढदिवसापर्यंतचा जाणून घ्या प्रवास…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल या अभिनेत्रीचा ५ ऑगस्टला ४८ वा वाढदिवस आहे. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर ९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी  एक आहे.

चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
१९९२मध्ये काजोलने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती अवघ्या १६ वर्षांची होती. या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि आणि पूर्णवेळ करियर करण्यावर लक्ष केंद्रित केले.
१९९३ मध्ये काजोल ‘बाजीगर’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते.
काजोलचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातील शाहरुख काजोलची जोडी चांगलीच पसंत केली गेली.
२४ फेब्रुवारी १९९९ रोजी अजय देवगण आणि काजोलची लग्नगाठ बांधली. दोघांची पहिली भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली. काजोलचे लग्न झाले तेव्हा तो टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री होती.
१९९५ मध्ये काजोल ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामधून बॅक टू बॅक दिसली. तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले.

Latest Posts

Don't Miss