अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

अदितीने सिम्पल गोल्डन साडी, नथ, झुमके, बांगड्या, केसांत गजरा तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता व पारंपरिक लुंगी असा पोशाख परिधान केला.

‘हीरामंडी’ (Heeramandi)चित्रपटातून गजगामिनी वॉकने चाहत्यांवर भुरळ पाडणारी बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi raohydari) आणि ‘रंग दे बसंती’ फेम लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ (Siddharth)यांनी मार्च महिन्यात तेलंगणा येथे साखरपुडा उरकला होता. त्यानंतर चाहते त्यांच्या साखरपुड्यापासून त्यांच्या लग्नासाठी उत्सुक होते. अखेर त्यांनी गुपचूप लग्न उरकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

सर्वच चाहते अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी अतिशय उत्सुक होते. अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
“तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस. आयुष्यभराचा साथी बनण्यासाठी, हसण्यासाठी, कधीही दूर न जाण्यासाठी शाश्वत प्रेम, प्रकाश. श्री व सौ. अदू-सिद्धू”, अश्या कॅप्शनसह सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.
या फोटोजमध्ये दोघांचा पारंपरिक लूक पद्धतीचा लुक पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडला आहे.
अदितीने सिम्पल गोल्डन साडी, नथ, झुमके, बांगड्या, केसांत गजरा तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता व पारंपरिक लुंगी असा पोशाख परिधान केला.
अदिती आणि सिद्धार्थ यांनी आपल्या जवळच्या लोकांसह विवाहसोहळा पार पाडला. अग्नीच्या साक्षीने एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले.
अदितीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांच्या नवविवाहित जीवनासाठी अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद दिलेत.

 

Exit mobile version