Ajit Pawar Birthday: असे केले अजितदादांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन

Ajit Pawar Birthday: असे केले अजितदादांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन

पारनेर अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या सदिच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. अजित पवार यांनी ट्विट करून सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबद्दल सर्वाना सांगितले. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांना गुलाबाचं फूल दिलं. अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

आज सकाळपासूनच अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचे फूल दिले. त्यांनी दिलेले फूल जॅकेटवर लावून अजित पवार नगरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या कंपनीने महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर वाढवावा असा सल्ला दिला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग आत ठसठशीत दिसू लागला आहे.
पारनेर अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या सदिच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या मुलांनी कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
तसेच काल पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी जवळपास १०० किलोचा केक कापला होता.

 

Exit mobile version