मेहाच्या प्रेमात अक्षर पटेल झाला आऊट, वडोदरा येथे पार पडला विवाह सोहळा

मेहाच्या प्रेमात अक्षर पटेल झाला आऊट, वडोदरा येथे पार पडला विवाह सोहळा
क्रिकेट विश्वात सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. बऱ्याच क्रिकेट पटूंनी लग्न केलेले फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता क्रिकेट विश्वातील आणखी एक क्रिकेटपटूने लग्न केल्याची माहिती आली आहे. ती म्हणजे टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने सुद्धा नवीन वर्षात आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
भारतीय क्रिकेट विश्वातील ऑलराऊंडर अक्षर पटेल याने २६ जानेवारीला त्याची गल्फ्रेंड मेहा पटेल सोबत लग्न गाठ बांधली आहे.अक्षरची पत्नी मेहा ही डायटिशियन आणि न्यूट्रीशनिस्ट आहे. अक्षर पटेल आणि मेहा मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आणि आता ते लग्न बंधनात अडकले आहेत.
गुजरातमधील वडोदऱ्याच्या कबीर फार्मवर गुरुवारी संध्याकाळी अक्षर पटेलचा लग्न सोहळा पार पडला. यात वऱ्हाडी मंडळींनी जोरदार डान्स केला. फटाके फोडले. अक्षरच्या लग्नाला आलेल्या सर्वांनीच धमाल केली. अक्षरच्या या लग्न सोहळ्यात बऱ्याच मंडळींनी आपली उपस्थिती लावली

 

अक्षर पटेलने स्टायलिश अंदाजात लग्न मंडपात एन्ट्री मारली. अक्षर पटेल एका विंटेज कारमध्ये बसून तो लग्नमंडपात पोहोचला. तसेच सोबत असलेल्या मित्रपरिवाराने जोरदार डान्स करून अक्षरच्या एंट्रीला रंगत आणली.
भारताचे माजी क्रिकेटर मोहम्मद कैफही अक्षरच्या लग्नात पोहोचला होता. कैफने या जोडप्यासोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आहेत.
अक्षरच्या लग्नाला क्रिकेटपटू जयदेव उनाडकट आणि त्याच्या पत्नीने उपस्थिती लावली होती. जयदेवने सोशल मीडियावर नव्या जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे.
Exit mobile version