spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंबानींची लहान सून म्हणजे सौंदर्याची खाण, तर ३ वाजता वरात, ८ वाजता वरमाळा.. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल

राधिकाच्या नववधूच्या पोषाखातले फोटो पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यामंध्ये वधू-वराचा अतिशय सुंदर लूक समोर आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा आज लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानीचे राधिका मर्चंटसोबत आयुष्यभराची गाठ बांधली जाणार आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जियो वर्ल्ड सेंटर येथे हा लग्नसोहळा होणार आहे. या लग्नासाठी देश विदेशातून पाहुणे आले आहेत. या खास दिवशी जगभरातील लोक पाहुणे या शाही सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यामध्ये राधिकाच्या नववधूच्या पोषाखातले फोटो पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यामंध्ये वधू-वराचा अतिशय सुंदर लूक समोर आला आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. तर वरमालाची विधी रात्री ८ वाजता संपन्न होईल. त्यानंतर अनंत-राधिका रात्री ९.३० वाजता सप्तपदी घेणार आहेत.

मुकेश अंबानी यांची होणारी सून आणि अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत. लग्नापुर्वीच्या विधीं दरम्यानचे हे फोटो आहेत. प्रत्येक लूकमध्ये राधिका मर्चंट प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या त्यांच्या फोटोंची चर्चा चांगलीच रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये राधिका प्रचंड सुंदर दिसत आहेत.
नववधूच्या चेहऱ्यावर येणारं तेज राधिका मर्चंटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आता लग्नात राधिका आणि अनंत कोणता आणि कसा लूक करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राधिकाच्या कुटुंबीयांनी खास गरबा रात्रीचे आयोजन केले होते. त्यावेळी हे खास क्षण काढण्यात आले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये एकीकडे राधिकाच्या सौंदर्य पाहण्यासारखे आहे, तर दुसरीकडे तिची बहीण आणि कुटुंबासोबतचे तिचे प्रेमळ नाते मन जिंकत आहे.
सोशल मीडियावर गरबा रासचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी राधिका आणि तिची बहिण खूपच सुंदर दिसत होती. अंजली मर्चंटने हिरा पन्ना असलेला पिवळा आणि केशरी कॉम्बिनेशन असलेला लेहेंगा परिधान करून तिला आकर्षक बनवले. तर राधिका मर्चंट ताहिलियानीचा लेहेंगा परिधान केला होता.
माहेर सोडण्याआधी राधिका मर्चंटने तिच्या आजीसोबत खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुलीच्या कुटुंबीयांनी खास गरबा रात्रीचे आयोजन केले होते त्यावेळी हे फोटो काढण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे हळदी सोहळयाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात राधिकाने परिधान केलेली खऱ्या फुलांपासून तयार केलेल्या ओढणीने तिचे सौंदर्य वाखणण्याजोगे होते.

Latest Posts

Don't Miss