रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा आज लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानीचे राधिका मर्चंटसोबत आयुष्यभराची गाठ बांधली जाणार आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जियो वर्ल्ड सेंटर येथे हा लग्नसोहळा होणार आहे. या लग्नासाठी देश विदेशातून पाहुणे आले आहेत. या खास दिवशी जगभरातील लोक पाहुणे या शाही सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यामध्ये राधिकाच्या नववधूच्या पोषाखातले फोटो पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यामंध्ये वधू-वराचा अतिशय सुंदर लूक समोर आला आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. तर वरमालाची विधी रात्री ८ वाजता संपन्न होईल. त्यानंतर अनंत-राधिका रात्री ९.३० वाजता सप्तपदी घेणार आहेत.