‘आँखों को इंतज़ार तेरा…’ कॅप्शन देत अमृता खानविलकरचे गुलाबी साडीतील फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

‘आँखों को इंतज़ार तेरा…’ कॅप्शन देत अमृता खानविलकरचे गुलाबी साडीतील फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने गुलाबी पैठणीत केलेल्या फोटोशूटमधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजवर अमृताच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृताने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच ‘आँखों को इंतज़ार तेरा…’ असे कॅप्शन देत गुलाबी पैठणीतील फोटोज शेअर केले आहेत.
या पैठणीवर अमृताने मोत्यांचा हार, कानात कुंदन आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. तसेच केसांत गुलाबांच्या फुलांचा वापर केला आहे.
गुलाबी पैठणी साडीवर अमृताने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे ज्यामुळे पैठणीचा लुक आणखीच खुलला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर ही लवकरच ‘Like आणि Subscribe’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
गुलाबी पैठणीतील अमृताच्या फोटोजचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अमृता खानविलकरच्या पैठणी साडीतील फोटोजवर एका चाहत्याने ‘चंद्रमुखी’ अशी कंमेंट दिली आहे.

 

Exit mobile version