Anant- Radhika Wedding : आशीर्वाद सोहळ्यात वरमाईने वेधले लक्ष ; साडीचा ब्लाउज पाहून फॅशन जगतात झाली विस्तृत चर्चा

Anant- Radhika Wedding : आशीर्वाद सोहळ्यात वरमाईने वेधले लक्ष ; साडीचा ब्लाउज पाहून फॅशन जगतात झाली विस्तृत चर्चा

सद्य घडीला आणि विद्यमानस्थीत बहुचर्चित असलेला एक शाही लग्न सोहळा रोज नव्या नव्या घडामोडी, नवनवीन कारणांनी चर्चेचा विषय बनत आहे. त्याच प्रमाणे आता या शाही लग्न सराईतील वरमाई विशेष चाहत्यांचे लक्ष आकर्षित करताना दिसत आहे. हे लग्न म्हणजे बातच न्यारी असे आहे. जवळ जवळ ही लग्नसाराई १ महिना तरी नक्कीच चालली असेल. यात सर्वात जास्त लक्ष वेधणारी वरमाईंचं होती. तिच्या काही आऊटफिट्स बद्धल आपण जाणून घेऊयात.

वरमाईचा सर्वात जास्त गजलेला आऊटफिट म्हणजे हा लेहंगा चाहत्यांचे विशेष लक्ष आकर्षित करून घेत आहे. वराची गोल्डन मदर – नीता अंबानी सानुकूल अबू जानी ,संदीप खोसला यांनी तयार केलेला लेहंगा परिधान केला आहे. ज्यात कुटुंब, प्रेम आणि उत्कृष्ट कारागिरीचा सन्मान केला गेला आहे.
नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंतच्या लग्नाच्या शुभ आशीर्वाद समारंभासाठी अतिशय खास लुक निवडला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ब्लाउज वर स्वपरिवाराची नवे कोरन प्रेम व्यक्त केले आहे.
नीता अंबानींनी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. नीता अंबानी यांनी हँड क्राफ्टेड जरदोजी लेहेंगा एका खास रत्नजडीत जडलेल्या ब्लाउजसह परिधान केला होता.
नीता अंबानी यांनी वीरेन भगतने डिझाइन केलेल्या पन्नाच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला.
याआधी नीता अंबानी यांनी मेहंदी फ्लॉन्ट केली होती. तळहातावर राधा-कृष्ण यांची प्रतिमा होती. तर, एक हाताच्या मागील बाजूस अनंत-राधिकाचे नाव लिहिले होते. दुसऱ्या हातावर पती मुकेश अंबानी, मुलगा-सून आकाश-श्लोका, मुलगी जावई ईशा-आनंद यांच्यासह नातवंडांची नावे लिहिली होती.
या ब्लाउजमध्ये पूर्णपणे हाताने भरतकाम केलेले नक्षीकाम आणि पाठीवर शुभ हत्ती होता. त्याशिवाय, बॉर्डरवर भरतकाम केलेले काही श्लोक लिहीले होते.
१२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले होते. १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर, १४ जुलै रोजी ग्रँड वेडिंगने रिसेप्शन होस्ट केले होते.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेची तांत्रिक अडचण होणार दूर ; राज्यसरकारने केले काही नवे बदल

६० वर्षांवरील जेष्ठांसाठी नवी खुशखबर ; राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना’ होणार लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version