Ashadhi Ekadashi 2024: यंदाच्या एकादशीला छोट्या वारकऱ्यांना करा ‘असे’ तयार

आषाढ महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो.

Ashadhi Ekadashi 2024: यंदाच्या एकादशीला छोट्या वारकऱ्यांना करा ‘असे’ तयार

आषाढ महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या निघून पंढरपूरकडे प्रस्थान होतात. या काळात दिंड्या, टाळ आणि मृदूंगासह विठूच्या नावाचे गजर करत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जातात. यंदा आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा १७ जुलै रोजी असणार आहे. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

पांडुरंगाचे कित्येक भक्त संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी येतात. या वारकऱ्यांमध्ये छोट्या वारकऱ्यांचाही समावेश असतो.
आषाढी एकादशीनिमित्त मुले वारकऱ्यांची वेशभूषा करू शकतात. तसेच शाळेतील कार्यक्रमात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल-रुक्मिणी यांपैकी कोणाची वेशभूषा करू शकतात.
आषाढी एकादशीनिमित्त मुलांना विठ्ठलासारखे तयार होण्यासाठी उपरणे, सोवळे, मुकुट,पारंपरिक दागिने, गंध इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासेल.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांच्याप्रमाणे वेशभूषा करण्यासाठी धोतर, बंडी, गंध, तुळशीमाळ, केशरी सोवळे, पगडी, उपरणे, चिपळ्या आणि वीणा इत्यादी गोष्टींची तयारी करावी लागेल.
आषाढी एकादशीनिमित्त मुलांचा खास पेहराव करण्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. त्यात महान मुली या वारीच्या पेहरावामध्ये अधिकच गोंडस दिसतात.
मुलींना वारकरी महिलांचा पेहराव करण्यासाठी नऊवारी साडी किंवा पारकर पोलके, छोटेसे तुळशी वृंदावन आणि पारंपरिक दागिन्यांची आवश्यकता असते.

 

 

Exit mobile version