spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024:आषाढी एकादशीनिमित्त तुमच्या घरी काढा ‘या’ सुंदर रांगोळ्या

वर्षभरात येणाऱ्या एकादशीमध्ये सर्वात महत्वाची असणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला 'महाएकादशी' असेही संबोधले जाते. पंढरपूरातील आषाढी एकादशीचा उत्सव हा डोळ्यांचा पारणं फेडणारा असतो.

वर्षभरात येणाऱ्या एकादशीमध्ये सर्वात महत्वाची असणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला ‘महाएकादशी’ असेही संबोधले जाते. पंढरपूरातील आषाढी एकादशीचा उत्सव हा डोळ्यांचा पारणं फेडणारा असतो. हा सोहळा आपल्या डोळ्यांना पाहायला मिळणे म्हणजे हे विठ्ठलभक्तांचे भाग्यच समजावे लागेल. या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या तिरी विठुरायाच्या लाडक्या भक्तांची आणि वारकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपाल्या घराबाहेर छान रांगोळी काढून विठूरायाची मनोभावे पूजाअर्चा करून घरात गोडाधोडाचे जेवण करून हा सण साजरा करा.

सणासुदीच्या दिवशी दाराबाहेर सुरेख रांगोळी काढणे शुभ मानले जाते. यामुळे घरातही चैतन्यमय वातावरण निर्माण होते. आषाढी एकादशी निमित्त तुम्हालाही आपल्या दाराबाहेर रांगोळी काढता येईल.
आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही विठ्ठलाची सुबक रांगोळी काढली तर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
विठ्ठलाची प्रतिमा आणि या रांगोळीच्या भोवती दिव्यांची रांग ठेवली तर ही रांगोळी आकर्षक वाटेल.
फ्लॅट सिस्टीमच्या घरात दाराबाहेर जागा कमी असल्याने सहसा मोठी रांगोळी काढता येत नाही. अशावेळी छोटी आणि सुबक रांगोळी उठून दिसेल.
तुळशी वृंदावनची ही रंगीबेरंगी मॉडर्न रांगोळी काढू शकता.
सोप्या पद्धतीची मोराच्या पिसांचा रंग असणारी विठूरायाची रांगोळी तुम्ही काढली तर घराबाहेरचा परिसर उठून दिसेल.

Latest Posts

Don't Miss