मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटलचे CM Eknath Shinde यांच्या हस्ते भूमिपूजन

मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटलचे CM Eknath Shinde यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटलचे भूमिपूजन आज करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सार्वजनिक-खाजगी-भागीदारी तत्वावर हे रुग्णालय विकसित करण्यात येणार आहे.
शास्त्रीनगर येथे शवविच्छेदन गृह तसेच नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग आणि सुनिलनगर येथील अभ्यासिकेचे लोकार्पण तसेच मासळी बाजाराचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
दत्तनगर येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, ॲड. मनिषा कायंदे, किसन कथोरे, संजय केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
Exit mobile version