रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत १००हून अधिक व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने पुन्हा एकदा बॉलिवूडची मान उंचावली आहे. दुसरीकडे, सोमवारच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या दिवशीही चित्रपटाची पकड मजबूत होती. या चित्रपटाने आतापर्यंत १४१ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाईच्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षातील काही मोठ्या चित्रपटांच्या सोमवारच्या कलेक्शनबद्दल: