Budget 2024:केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या साड्यांची चर्चा, नेमकं काय आहे खास ?

संसदेत अर्थसंकल्प सादर होतानाच आणखी एका गोष्टींकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातं ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साड्या. प्रत्येक बजेटच्या दिवशी त्यांच्या साडीची विशेष चर्चा होत असते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत आज (२३ जुलै) रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेत अर्थसंकल्प सादर होतानाच आणखी एका गोष्टींकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातं ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साड्या. प्रत्येक बजेटच्या दिवशी त्यांच्या साडीची विशेष चर्चा होत असते. आतापर्यंत त्यांनी बजेट सादर करताना कोणकोणत्या साडया नेसल्या ते पाहुयात.

२०२४-२५ मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार, आलं आहे. आता संपूर्ण बजेट सदर केलं जात आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पांढऱ्या रंगाची साडी आणि त्याला जांभळट गुलाबी रंगाची बॉर्डर आहे.

२०२३-२४ मध्ये त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा त्यांनी निळा आणि क्रीम रंगाची टसर सिल्क साडी परिधान केली होती. त्यावर क्रीम रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. त्यासाडीवर केलेली कलाकुसर ही हाताने केली होती. पश्चिम बंगालमधील स्थानिक पातळीवर वापरली जाणारी कलाकुसर हाताने या साडीवर करण्यात आली होती.
२०२२-२३ सध्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मरून रंगाची साडी परिधान केली होती. कर्नाटकातील कसुती म्हणून प्रसिद्ध असलेली साडी त्यांनी निवडली होती.

२०२१-२२ ला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ब्राऊन (तपकिरी) रंगाची बोमकाई साडी नेसली होती. हा मातीचा रंग असल्याने त्याला सर्वसमावेशक व व्यापक मानले जाते.
२०२०-२१ मधील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पोचमपल्ली पांढऱ्या रंगाची आणि लाल बॉर्डर असलेली साडी नेसली होती. हैद्राबादमधील स्थानिक परंपरा, कौशल्य कलाकुसर यांचा मिलाप या साडीवर पाहायला मिळत आहे.
२०१९-२० मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दुसरा अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा त्या पिवळ्या किंवा बसंती रंगाच्या साडीत होत्या. पिवळा रंग अत्यंत शुभ मनाला जातो.
निर्मला सीतारमण या पहिल्यांदाच अर्थमंत्री झाल्यानंतर २०१९ साली पहिल्याच बजेटला त्यांनी गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात.

Exit mobile version