भर पावसात मुख्यमंत्री पोहोचले वरळीमध्ये, कोस्टल रोडची पाहणी

कालपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

कालपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जोरदार पाऊस असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमधील कोस्टल रोडची आज पाहणी केली. तसेच येथ पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

राज्यामध्ये कालपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
मुंबईतील वरळीमधील कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. कोस्टल रोड इथं जात मुख्यमंत्री शिंदे यांनी पाणी साचण्याची कारणं जाणून घेतली.
वरळीमधील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल मुंबईमध्ये झालेल्या पहिल्याच पावसामध्ये पाणी साचलं होते.
भविष्यात या परिसरात पाणी साचू नये, नागरिकांचे हाल होऊ नयेत. यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
आज मिलन सबवे परिसरात १ तासात जवळपास ७० मिमी पाऊस पडला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तरीही येथील वाहतूक अजूनही सुरळित सुरु आहे. मिलन सबवेमधील लावलेली सिस्टिम सुरु आहे का?, काही अडचणी आहे का?, हे पाहण्यासाठी इथे आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version