मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन

मुंबईची शान असलेला लालबागचा राजा या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबासोबत लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहचले. तसेच लालबागच्या राजाची आरती सुद्धा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन मनोभावे सपत्नीक आरती केली.
राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत एवढेच मागणे त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितले.
मुख्यमंत्र्यांनी लाल्बागच्या राजाच्या पायावर डोकं ठेवून राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव अशी प्रार्थना केली.
लालबागच्या राजा चरणी मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या सुखासाठी आणि समाधानासाठी प्रार्थना केली आहे.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू चि. रुद्रांश, टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर आणि इतर सर्व सहकारी उपस्थित होते.
Exit mobile version