Wednesday, July 3, 2024

Latest Posts

काळ्या वर्तुळांनी डोळ्यांना घेरलयं ? तर ‘हा’ उपाय नक्की करा

डार्क सर्कल्समुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी होते. चेहरा निस्तेज, सुस्तावलेला दिसतो. अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, निद्रानाश किंवा जास्त ताण यामुळे डार्क सर्कलची समस्या निर्माण होते.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circle) येण्याची अनेक करणे असू शकतात. आजकाल दैनंदिन जीवनातील वाढत ताण, तासनतास कॉम्पुटरवर काम करने आणि पुरेशी झोप न लागणे या अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही एक गंभीर समस्या झाली आहे.
बाजारात अनेक प्रकारचे क्रीम आणि सिरम उपलब्ध आहेत जे डार्क सर्कल्स कमी करण्याची हमी देतात. मात्र ही रसायने असलेल्या उत्पादनांमध्ये फायद्यांपेक्षा अधिक दुष्परिणाम होताना दिसतात.
अशा परिस्थितीत सहजसोप्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही फळ भाज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स कमी करू शकता.
बटाट्याचा स्टार्च डार्क सर्कल दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी बटाट्याच्या स्टार्चमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाने डोळ्यांखाली लावा.
टोमॅटो हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध होणारी फळभाजी आहे. डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करता येतो. टोमॅटो हे नैसर्गिक पद्धतीने डार्क सर्कल कमी करण्याचे काम करते. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. टोमॅटो त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम आणि टवटवीत होते.
डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. मध आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे त्वचेवरील डाग आणि काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करते.

Latest Posts

Don't Miss