Kartiki Ekadashi निम्मित पंढरी दुमदुमली!, फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. कार्तिकी एकादशी निम्मित सर्व पंढरी ही दुमदुमली आहे.

Kartiki Ekadashi निम्मित पंढरी दुमदुमली!, फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

Kartiki Ekadashi 2023 : आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. कार्तिकी एकादशी निम्मित सर्व पंढरी ही दुमदुमली आहे. यानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा पार पडली..

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिरावर विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशी यात्रा २०२३ निमित्त गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली.
शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली.
हे मानाचे वारकरी शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचे वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आले.
यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्तिकी एकादशी सोहळा म्हणजे लाडक्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा दिवस… त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीच्या किनारीही भक्तांनी गर्दी केली आहे. चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीच्या दर्शन करत वारकरी कृतकृत्य होतात.
माऊली विठ्ठला, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आम्हाला दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Exit mobile version