spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सावनी रविंद्रचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

सावनी रविंद्रचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

गायिका सावनी रविंद्र हिने आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे.सावनी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते,ती तिचे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळते.

सावनी रविंद्र हिने आपल्या आवाजाच्या जादुने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे, आणि सध्या सावनी तिच्या हटके आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका म्हणून सावनी रविंद्र मराठी सिनेसृष्टीत ओळखले जाते.
सावनीने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. सावनीला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने ही गौरवण्यात आले आहे.
आपल्या गायनाने चर्चेत असणारी सावनी सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.सावनीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिने रेड कलरचा गाऊन परिधान केला आहे.या फोटोशूटमध्ये सावनीच्या या लूकला तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.
तर दुसरे फोटोशूट तिने बॉसी लूकमध्येही केले आहे.त्यात तिने न्यूड मेकप करुन लूक पुर्ण केला आहे.
या फोटोशूटमध्ये तिने परफॉर्म करत असल्याची पोझ दिली आहे.तिच्या फोटोशूटला देखील प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Latest Posts

Don't Miss