spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kartiki झाली आई, चाहत्यांना कळवली गोड बातमी

मराठी संगीत सृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे कार्तिकी गायकवाड.
कार्तिकी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घरा-घरात ओळखली जाऊ लागली.
२०२० मध्ये कार्तिकी रोनित पिसेशी विवाहबंधनात अडकली.
कार्तिकीने काही महिन्यांआधीच आई होणार असल्याचे जाहीर केले होते.
काही महिन्यांआधी तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो देखील तिने शेअर केले होते.
आता १४ मे रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
कार्तिकी आणि रोनितला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मिडियावर शेअर केली आहे.
कार्तिकीने तिच्या डोहाळे जेवणातला एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
कार्तिकीने त्या व्हिडिओमध्ये तिचा अनुभव सांगितला आहे. हे सर्व तिच्यासाठी नवीन आणि भावनिक असल्याचं तिने सांगितलं 

Latest Posts

Don't Miss