spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी ‘हे’ नियम पाळावे लागणार…

पुण्यामध्ये ठिकठिकाणी गणपती मंडळे पाहायला मिळतात. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही तासनतास चालते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त, हजारो लोक रस्त्यावर उतरतात. अशा गणेशभक्तांना त्रास होऊ नये म्हणून काही नियमावली जाहीर केली आहे.

गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खास मुंबई आणि पुणे शहरात या उत्सवाचा एक वेगळाच जल्लोष साजरा केला जात असतो. प्रत्येक घराघरांत गणपती बाप्पा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच अनेक छोट्या मोठ्या मंडळांकडूनही गणपती उत्सव साजरा केला जातो. पुण्यामध्ये ठिकठिकाणी गणपती मंडळे पाहायला मिळतात. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही तासनतास चालते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त, हजारो लोक रस्त्यावर उतरतात. अशा गणेशभक्तांना त्रास होऊ नये म्हणून काही नियमावली जाहीर केली आहे.

 

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. बाप्पा घरी येणार म्हणून सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनजीटीच्या पश्चिम खंडपीठ यांनी ३० ऑगस्ट रोजी अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्यात अनेक नियमावलीचा समावेश आहे.
गणेशोत्सवात सर्व भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. हा सार्वजनिक उत्सव असल्याने काही नियमही पाळावे लागतात. पुण्यातील गणपती विसर्जनाबाबतची नियमावली समोर आली आहे. यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.
एनजीटी खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार पुण्यातील सणासुदीच्या वेळी ध्वनी नियंत्रणाचे अनेक उपाय अनिवार्य केलं आहेत. यात गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
डीजेचा आवाज हा आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या गणेशोत्सवात मिरवणुकीच्या काळात काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss