spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : गणपती उत्सवात पारंपारिक पण स्टायलिश लुक करायचंय ? ‘या’ टिप्स करा फॉलो

सण उत्सवांच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा पारंपरिक प्रकारचे पोशाख घालावे लागतात. आता काहीच दिवसांवर गणेशोत्सव येईल. या दिवसांमध्ये महिलांना काय घालायचे याबाबत चिंता असते. परंतु अश्या काही टिप्स वापरून तुम्ही सणासुदीच्या दिवसांत पारंपरिक पद्धतीतच पण स्टायलिश लुक बनवू शकता.

गणेशोत्सवानिमित्त तुम्ही खास काठाच्या साड्या वापरू शकता. ज्यावर ट्रेण्डी ज्वेलरी परिधान करून एक खास लुक तयार होईल. ज्यात तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
तसेच काठाच्या साडीचा ड्रेस शिवून युनिक लुक बनवू शकाल. यामध्ये आकर्षक लुक दिसेल.
पांढऱ्या रंगाच्या ब्लाउजसह सिल्क साडी सुद्धा तुम्ही गणेशोत्सवाच्या दिवसांत परिधान करू शकता. पांढऱ्या रंगामुळे तुम्ही अगदी प्रभावी दिसाल.
त्याचप्रमाणे विविध रंगी असलेल्या सिल्क साडी निवडून लुक एक खास बनवा.
तसेच रंगीबेरंगी असलेले अनारकली ड्रेस सुद्धा गणपती उत्सवात वापरू शकाल.
ट्रेण्डिंग असलेल्या पॅटर्नमध्ये नऊवारी साडी नेसून त्यावर मोत्याचे दागिने घाला. अगदी संपूर्णपणे पारंपरिक पोशाख तयार होईल.

Latest Posts

Don't Miss