spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…

Ganeshotsav Look 2024 : गणेशोत्सवाची वर्षभर सर्वच गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी सर्वच ठिकाणी अगदी जोरात तयारी चालू आहे. सर्वजण केवळ गणपती बाप्पाचे डेकोरेशनच नाही तर स्वतःचा एक खास लुक बनवण्याच्या तयारीत असतात.

गणपती आगमनाच्या दिवशी पारंपरिक महाराष्ट्रीयन लुकमध्ये तयार होण्यासाठी तुम्ही खास पद्धतीची नऊवारी साडी नेसू शकता किंवा रेडिमेड विकत घेऊ शकता.
साडी म्हंटलं तर दागिने हे आलेच. नऊवारी साडीवर पारंपरिक सुंदर दागिने तुम्ही परिधान करा. साडी खुलून दिसेल.
कानामध्ये गोल्डन सुंदर झुमके घालून गळ्यातील दागिन्यांना आणखी शोभा येईल.
कपाळावर टिकली लावावी. नऊवारी साडीवर खास चंद्रकोर टिकली लावली जाते. कुंकवाने सुद्धा तुम्ही चंद्रकोर रेखाटु शकाल.
जर तुम्हाला सोनेरी रंगातील ज्वेलरी आवडत नसेल तर ट्रेंडिंग असेलेली ऑक्सिडाईज ज्वेलरी सुद्धा वापरू शकता.
पारंपारिक नऊवारी साडीवर केसात गाजर माळायला अजिबात विसरू नका.

 

Latest Posts

Don't Miss