बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शाहरुख खानने छोटया पडद्यावरुन अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने त्याचा मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटात पदार्पण केले होते. शाहरुख म्हणाला आहे की अभिनेता हा पाण्यासारखा असतो. त्याने फक्त स्वतः मधील कला ओळखली पाहिजे. माझा असा विश्वास आहे की कला महत्वाची आहे. कलाकार नाही.
बॉलीवूडचा बादशाह आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री शाहरुख खानला वाढदिसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बंगल्यासमोर चाहत्यांनी अफाट गर्दी केली होती.
शाहरुख खान हा इंडियन ऍक्टर (Indian actor) आहे. तसेच त्याला चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहे. १९९७ साली सर्वोत्कृष्ट भारतीय नागरिक पुरस्कार (Best Indian Citizen Award) , २००२ साली मनोरंजन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी राजीव गांधी पुरस्कार (Rajiv Gandhi Award for Excellence in Entertainment), २००५ साली पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award). याच सोबत त्याला फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) देखील मिळाले. १९९७ साली सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best actor) म्हणून पुरस्कार मिळाला होता
शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ साली दिल्ली येते झाला. तसेच शाहरुख खानचा पहिला चित्रपट “दिवाना” (Deewana) हा खूप त्या काळी गाजलेला चित्रपट होता. त्याच बरोबर चमत्कार (miracle) , ओम शांती ओम (Om Shanti Om) , ब्रह्मास्त्र (Brahmastra), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale Dulhania Le Jayenge), कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham) , चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express), दिल तो पागल है (Dil To Pagal Hai) हे देखील चित्रपट त्याचे खूप गाजलेले आहेत.
शाहरुखचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तसेच शाहरुख खान पठाण (Pathaan) , जवान (Jawan) , या आगामी चित्रपटा मध्ये झळकणार आहे. या आगामी चित्रपटाची चाहते खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत.
बॉलिवूडचा किंग (King) शाहरुख खान आपल्या कष्टाच्या आणि क्षमतेच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीवर (film industry) राज्य करतो. तसेच
शाहरुखने असे यशाचे अनेक विक्रम गाठले आहे. जे आजकालच्या तरुण अभिनेत्यांसाठी आदर्श निर्माण करतात.
हे ही वाचा:
हे ही वाचा:
Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला