हॉलीवूडच्या अनेक सिनेमांनी जगभरातील प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये जगभरात हॉलिवूडचा बराच प्रेक्षकवर्ग निर्माण झालाय. आणि त्यात भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावणारा सिनेमा म्हणजे लॉर्ड ऑफ द रिंग्स. लॉर्ड ऑफ द रिंग्स हा सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि येत्या 2 सप्टेंबरला याची पुढची सिरीज ‘द रिंग्स ऑफ दी पॉवर’ प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
2 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होत असलेल्या ” द लॉर्ड ऑफ दि रिंग्स” च्या पुढील सिरीजचे ” द रिंग्स ऑफ दी पॉवर” च्या प्रमोशनचे आणि प्रिमीअर शोचे आयोजन ” प्राईम व्हिडीओ ” च्या माध्यमातून करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर वेब सीरिजच्या टीमने मुंबईतील डब्बेवाल्यांची भेट घेतली आणि लॉर्ड ऑफ दि रिंग्सच्या टीमने मुंबई डब्बेवल्यांच्या कामाबद्दल कुतूहल व्यक्त केले.
जागतिक पातळीवर प्रदर्शित होत असलेल्या ” रिंग्स ऑफ पॉवर ” चा आशियातील उद्घाटन सोहळा मुंबईच्या डब्बेवाल्यांसह जेवणाच्या आस्वाद घेत पार पडला.
आपल्या कामातील नियोजन आणि मेहनत थक्क करणारी असून तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात मत चित्रपटाचे लेखक जे. डी . पेन यांनी व्यक्त केले.
लॉइड ओवेन यांनी डबेवाल्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत डबेवाल्यां चे कामकाज कसे चालते हे जाणून घेतले.
या कार्यक्रमाला रॉब अरमायो, मॅक्सिम बाल्ड्री, मार्केला कावेनाघ, चार्ल्स एडवर्ड्स, लॉयड ओवेन, मेगन रिचर्ड्स आणि इतरांसह मालिकेच्या संपूर्ण कलाकारांनी भाग घेतला.
स्क्रिनिंगच्या अगोदर, अभिनेते रॉब अरमायो, मॅक्सिम बाल्ड्री, मेगन रिचर्ड्स, मार्केला कावेनाघ, एमा होर्वाथ, टायरोन मुहाफिदिन आणि सारा झ्वांगोबानी, रेड कार्पेटवर सोबत सामील झाले जिथे त्यांनी त्यांच्या मुंबई भेटीचे सर्वोत्तम क्षण शेअर केले.
हे ही वाचा:
खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात ; बाळासाहेब थोरात आक्रमक
सुपरस्टार रजनीकांतचे ‘जेलर’च्या फर्स्ट पोस्टरवर गंभीर लुक
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.