Independe Day 2023, देशाचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची आकर्षित शान कायम, पाहा मागील काही वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक…

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या, रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना कोटी कोटी प्रणाम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Speech) यांनी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केलं.

Independe Day 2023, देशाचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची आकर्षित शान कायम, पाहा मागील काही वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक…

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या, रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना कोटी कोटी प्रणाम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Speech) यांनी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केलं. किल्लावर ध्वजारोहण (#IndianFlag) करताना यंदाही मोदीं यांची फेट्याची (Feta) शान कायम होती. रुबाबदार अंदाज आणि त्यांचे फेटे…गेल्या काही वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूकवर एक नजर टाकूयात.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २०१४ मध्ये प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लावर ध्वजारोहण केलं. त्यावेळी ते लाल (Red) रंगाच्या फेटामध्ये दिसून आले.
दुसऱ्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिवळ्या (yellow) रंगाचा फेटा बांधून लाल किल्ल्यावर आले होते.
तिसऱ्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये मोदींनी लाल किल्ल्यावर राजस्थानी फेटा (Rajasthani Feta) बांधून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गुलाबी (pink) रंगाचा हा फेट्यामध्ये मोदींचा रुबाब काही औरच वाटत होता.
चौथ्या वर्षीही मोदींची फेटाची शान कायम होती. २०१७ ला मोदींनी लाल आणि पिवळ्या (red and yellow) रंगाचा चौकटींची डिझाइनचा (Frame design) फेटा बांधून देशाला संबोधित केलं.
त्यानंतर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधलेल्या केशरी (Orange) रंगाचा फेट्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ मधील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी (multicolored) फेटा बांधला होता. तोही त्यांच्यावर अतिशय आकर्षित वाटत होता.
भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केशरी आणि क्रिम (Orange and cream) रंगाचा फेटामधील लूक एकदम उठून दिसत होता.
त्यानंतर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या (yellow) रंगाचा फेटा बांधला होता.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ ला स्वातंत्र्याचा अमृतोत्सव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या (white) रंगाचा फेटा बांधला होता. मोदी यांच्या पांढऱ्या रंगाच्या फेट्यावर केशरी आणि हिरव्या (Orange and green) रंगाच्या छटा प्रचंड देशाची शान दिसून येतं होती.
यावर्षी म्हणजेच २०२३ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी राजधानी फेटा बांधला होता. लाल आणि पिवळ्या (red and yellow) रंगावर बांधणी नक्षीकाम असलेला फेट्यामध्ये मोदींची शान सलग १० व्या वर्षी कायम होती.

हे ही वाचा:

काही मिनिटांमध्येच शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात पुण्यातील पर्यटन ठिकाणी जाणाऱ्यांसाठी १०१ अतिरिक्त बसेसची सोय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version