spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Independence Day 2024: स्वातंत्र्यदिनी नक्की काढा अश्या तिरंगी रंगात विविध पद्धतीतील रांगोळ्या…

सण म्हंटले का रांगोळी ही असलीच पाहिजे. रांगोळी काढणे ही तर आपली पूर्वापार चालत आलेली हिंदू परंपरा आहे. या स्वातंत्र्यदिनी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत रांगोळी तयार करा. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग वापरून तुम्ही बनवू शकाल आकर्षक पद्धतीच्या रांगोळ्या. पुढील डिजाईन पाहून नक्की तयार करा विविध सुंदर पद्धतीच्या रांगोळ्या.

जर तुम्हाला जास्त जागा असलेल्या ठिकाणी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही गोल रांगोळी काढू शकता. त्यात आकर्षक पद्धतीने रंग भरल्यास ती अतिशय सुंदर दिसेल.
)जर तुमच्याकडे तिरंगाच्या रंगांची फुले उपलब्ध होऊ शकतात तर तुम्ही ताजी फुलांची रांगोळी तयार करू शकता.
नकाशा रांगोळी तयार करण्यासाठी तुम्ही नकाशाच्या आकाराचा वापर करू शकता. या पद्धतीची रांगोळी अधिक सुंदर आणि क्रिएटिव्ह दिसून येईल.
स्वातंत्र्यदिनी तुम्ही मोराच्या आकाराची रचना करून तिरंगी रांगोळी तयार करू शकता. मोराची रांगोळी तिरंगा रांगांमध्ये अतिशय नयनरम्य दिसून येईल.
जर तुम्हाला चांगल्या प्रकारे रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही पर्पज शेप डिजाईन मध्ये रांगोळी काढू शकता. ही रांगोळी एक युनिक लुक तयार करते.
इतर कोणते प्रकार जर कठीण वाटत असतील तर अगदी लहान आणि सोपी पद्धत वापरून तुम्ही नाजूक डिजाईन तयार करा.

Latest Posts

Don't Miss