spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Independence Day Baby Photoshoot: तुमच्या मुलांचे फोटोशूट स्वातंत्र्यदिन निमित्त फोटोशूट करायचंय? तर अश्या काही ट्रेंडिंग आयडिया वापरून करू शकाल…

१५ ऑगस्ट जसजसे जवळ यायला लागलाय तसा संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेत पाहायला मिळत आहेत. या स्वातंत्र्यदिनानिम्मित आपल्याला तुम्हाला तुमच्या लहान मुलांचे फोटोशूट करायचे असल्यास तिरंगा थीम वापरून तुम्ही ते करू शकता. सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येक खास क्षणाचे फोटोज काढून ठेवले जातात, फोटोशूटची ही आयडिया एक नवा ट्रेंडच बनला आहे. नवीन जन्माला आलेल्या बालकांचे त्यांच्या पालकांकडून त्यांचे बालपणीच्या आठवणी जपण्यासाठी सर्वजण हल्ली फोटोशूट करत असतात.

तिरंग्याचा वापर करून तुम्ही आकर्षक पद्धतीने तिरंगी रंगातील विविध आकाराचे पक्षी किंवा इतर वेगळे शेप्स वापरू शकता. मुलांना तिरंगा ओढणी किंवा स्कार्फमध्ये गुंडाळून तो विशिष्ठ पद्धतीने सेट करू शकता त्याने एक युनिक लुक तयार होईल.
जर तुमचे बाळ मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही भारतमातेचा वेष बनवून फोटोशूट करू शकता. या शूटसाठी कोणत्याही गडद रंगाचे कापड पसरवून त्यावर तिरंगा आणि तिरंगा संबंधित डिज़ाईन्स करून तुम्ही एक वेगळा बॅकग्राऊंड तयार करू शकाल.
घरच्याघरी जर तुम्हाला फोटोशूट करायचे असल्यास घरी तिरंगा फुगे किंवा झेंडा वापरून साध्या पण एक हसतखेळत बाळाचे फोटोशूट करू शकाल.
तिरंगा रंगाचे साधे कपडे घालून तुम्ही बाळाचे फोटोशूट करू शकाल. मुलाच्या आजूबाजूला तिरंगा रंगाची सजावट करून त्याच्या हातात एक झेंडा देऊन फोटोशूट केलात तर छान फोटोज येतील.
बाजारात सहज उपलब्ध होणारे लहान मुलांसाठीचे तिरंगा टी-शर्ट्स वापरून बाळाला हसवता हसवता फोटोज क्लिक केले तर आणखी सुंदर फोटो येऊ शकतील.
जर मुलग्याचे फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही त्याला सैनिकी वेष परिधान करून आजूबाजूला तिरंगी सजावट केल्यास त्याच्या हातात झेंडा देऊन फोटोशूट सुद्धा करू शकता. सैनिकी वेशातील तिरंगा हातात घेऊन फोटो काढल्यास ते खूपच सुंदर येतील.

Latest Posts

Don't Miss