कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार

कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने  मानले बाप्पाचे आभार

स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची मुख्य भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने स्टार प्रवाह वाहिनी तसेच मालिकेतील सहकलाकार आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. मालिकेवर आणि सायली या पात्रावर असंच भरभरून प्रेम करा, अशी मागणी तिने प्रेक्षकांकडे केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग ‘ मालिकेवर चाहत्यांनी भरपूर प्रेम केलं आहे आणि प्रतिसाद दिला आहे.
पहिल्यापासूनच जुई गडकरीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिचा सहज आणि साधा अभिनय लोकांना भावतो.
मात्र अभिनेत्री जुई गडकरीने शूटिंग मधून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. कारण तिच्या कानाला दुखापत झाली होती.
औषधोपचार करून बरे वाटेल असे जुईला वाटले होते, परंतु ते दुखणे वाढतच गेले.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला. त्यामुळे शूटिंगमधून जुईला आठवड्याभराचा गॅप घेण्याची गरज होती.
या गंभीर परिस्थितीत साथ दिल्यामुळे जुईने मालिकेचे दिग्दर्शक, संपूर्ण टीम, प्रेक्षक वर्ग आणि बाप्पाचे मनापासून आभार मानले आहेत.
Exit mobile version