spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaugcha Raja 2024 First Look Photo: मुंबईची शान असलेल्या ‘लालबागच्या राजाचे’ प्रथम दर्शन; पहा फोटो…

मुंबईत अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या आधीच सार्वजनिक मंडळात गणेश मूर्ती आणल्या जातात. त्यात सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचे (दि.५ सप्टेंबर २०२४) रोजी आगमन झाले आहे. मोठ्या ऐटीत लालबागचा राजा मंडपात विराजमान झाला आहे. गणरायाच्या आगमनाने गणेशभक्तांमध्ये सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. चला तर मग पाहूया लालबागच्या राजाचे प्रथम मुखदर्शन.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते अखेर ती घटिका आली. लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.
७ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पूर्वीच लालबागच्या राजाचा पहिला फोटो समोर आला आहे.
आज दि. ५ ऑगस्ट रोजी लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला.
लालबागच्या राजाचं प्रथम मुखदर्शन पाहण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. अनेकांनी आपल्या डोळ्यात तर काहींनी कॅमेऱ्यात बाप्पाचं पहिलं रूप साठवलं.
लालबागच्या राजाला सुंदर मरूण रंगाचे पितांबर नेसवले आहे, त्यामुळे बाप्पाची मूर्ती अजूनच खुलून दिसत आहे त्याचबरोबर बाप्पाच्या पायाच्या शेजारी गधा ठेवण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss