नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अन्…, अमृता फडणवीस यांचा पारंपरिक लुक पहा…

“मंगळागौर" म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील वर्सोव्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात.

नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अन्…, अमृता फडणवीस यांचा पारंपरिक लुक पहा…

“मंगळागौर” म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील वर्सोव्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार व ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती लव्हेकर (President Bharati Lovekar) यांनी श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे निमित्ताने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी पश्चिममध्ये करण्यात आले होते. अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा येथील ‘मंगळागौर’ उत्सवात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली. अमृता फडणवीस यांनी महिलांसोबत फुगडी खेळून आनंद लुटला. खास आग्रहात्सव अमृता फडणवीस यांनी उखाणादेखील घेताला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्या इन्स्टाग्रामवर विविध कार्यक्रमातील फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आता त्यांनी मंगळागौर उत्सवाचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अमृतांचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये अमृता फारच सुंदर दिसत आहेत.
या समारंभात त्या अतिशय चांगल्या फुगडीदेखील खेळल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी सुंदर असे गाणंही गायलं.
वर्सोवा विधानसभा क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमात ३ हजारपेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
मराठमोळी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ खेळले, फुगडी खेळली, उखाणा घेतला, असं अमृता फडणवीस कॅप्शनमध्ये म्हणाल्या.
अनेक महिलांसोबत सेल्फी काढली. महिलांशी भरभरून आणि मजेशीर गप्पा मारल्या. मन प्रफुल्लित झाले आणि भारतीय पारंपरिक सणाची मजाही अनुभवली, असं अमृता यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

Vijay Wadettiwar यांचं मोठे विधान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात…

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा “टेरिटरी”

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version