Navratri Fashion : यावर्षीच्या नवरात्रौत्सवात ‘या’ अभिनेत्रींच्या फॅशन टिप्स वापरून पहा; दिसाल आणखी खास

Navratri Fashion : यावर्षीच्या नवरात्रौत्सवात ‘या’ अभिनेत्रींच्या फॅशन टिप्स वापरून पहा; दिसाल आणखी खास

Navratri Fashion : काहीच दिवसांत नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. नवरात्रीत ठिकठिकाणी गरबा, दांडियांचा उत्साह असतो. विविध ठिकाणी दांडिया नाईटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अनेक तरुणी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. यावेळी गरबा नाईटमध्ये अश्या काही अभिनेत्रींसारखा ट्रेण्डी पद्धतीने लुक तयार करा जो इतरजणींपेक्षा अनोखा असेल.

यावर्षी नवरात्री उत्सवात दांडियासाठी अभिनेत्री सारा अली खान सारखा जरी वर्कचा लेहेंगा परिधान करू शकता.
असा लेहेंगा ज्यावर अतिशय सुंदर अशी जरी वर्क असेल. या लेहंग्यावर मिरर वर्क ज्वेलरी किंवा चोकर स्टाईल देखील करू शकाल.
फ्लोरल प्रिंटच्या लेहेंग्यात एम्ब्रॉयडरी असलेला लेहेंगा अनेक जणी घालताना दिसतात. या प्रकारचा लेहेंगा साधा पण युनिक असा लुक तयार करेल.
हेव्ही वर्कचा लेहेंगा जर का तुम्हांला आवडत नसेल तर तुम्ही फ्लोरल प्रिंट असलेला लेहेंगा घालू शकता.
नवरात्रीला यावेळी तुम्ही एम्ब्रॉडरी वर्क असलेला लेहेंगा घालू शकता जो तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल.
जर तुम्हाला पैठणी सारख्या साड्यांची आवड असेल तर तुम्ही पैठणीपासून तयार केलेला लेहेंगा नक्की ट्राय करून पहा. या प्रकारचे लेहेंगेसुद्धा ट्रेण्डी आहेत.
Exit mobile version