spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज लता दीदींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील आठवणींच्या क्षणांचा परिचय घ्या जाणून

स्वर्गीय आवाज, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज ६ फेब्रुवारी २०२३ यांची पुण्यतिथी. लतादीदींनी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक भाषांमध्ये हजारो अविस्मरणीय गाणी गायली आहेत. त्यांनी ३६ भाषांमध्ये ५०,००० हून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्यांचा अविस्मरणीय आवाज रसिकांनी जपून ठेवला आहे. लता दीदींनी लहान वयातच गाण्यास सुरवात केली होती. १९३८ मध्ये दीनानाथ मंगेशकर यांच्यासोबत सोलापूरमध्ये दीदींनी एका मैफिलीत पहिल्यांदा त्यांचे गाणे सादर केले होते.
लता मंगेशकरांना कुत्रा हा प्राणी पाळण्यास खूप आवडत असे,त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत काढलेला सुंदर फोटो
एकाच फ्रेममध्ये दोन भारतरत्न पुरस्कार विजेत्या आहेत. या फोटोमध्ये एमएस सुब्बुलक्ष्मी लता मंगेशकर या दोघीही एकमेकींशी संवाद साधत
लता मंगेशकर आणि दिग्गज संगीतकार एसडी बर्मन यांच्यासोबत गाण्याची तयारी करत असतानाच हा क्षण या संगीतकार जोडीने एकत्र अनेक हिट चित्रपट दिले
लता मंगेशकर आणि श्रेष्ठ कवीआणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या सोबत काम करतानाचे क्षण, या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटासाठी काम केले.
लता मंगेशकर यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा सन्मान त्यांना १९७२, १९७५ आणि १९९० मध्ये देण्यात आला होता. यानंतर त्यांना १९ शतकात ६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. गायनाच्या बळावर लता दीदींना १९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००१ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला.

 

हे ही वाचा : 

Grammy Awards 2023, भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव

Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss