Tuesday, July 2, 2024

Latest Posts

पावसाळी पिकनिकचा प्लॅन करताय? मग ‘येथे’ नक्की भेट द्या.

पावसाळ्यात खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण पावसाळी पिकनिक चा प्लॅन करतात. जर तुम्हालाही यंदाच्या पावसाळ्यात तुमच्या कुटुंबासोबत मज्जा करायची असेल, तसेच कमी बजेटमध्ये सहलीचे नियोजन करायचे असेल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्रात असे काही ठिकाणे आहेत ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभले आहे. चला तर मग महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणे पाहुयात.

माथेरान हे पर्यावरणमुक्त हिल स्टेशन मुंबईपासून अगदी ११० किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो. हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून ८०३ मीटर अंतरावर आहे.
अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट म्हणजे माळशेज घाट हा आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृश्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढे कमी पडते. पावसाळ्यात माळशेज घाट फुलणारं नंदनवन आहे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात येते.
मुंबई आणि पुणेकरांना लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणे सोयीचं पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्यात वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट आणि रे वुड पार्क असे अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात या महाबळेश्वरची ट्रिप ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे ठिकाण ‘महाराष्ट्राची राणी’ म्हणून ओळखले जाणारे हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणाची शोभा पाहण्यासारखी असते. येथील प्रसन्न, थंड आणि शांत वातावरणामुळे येणारे पर्यटक हे मंत्रमुग्ध होऊन जातात.
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे देवस्थान हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे एक उत्तम पर्याय आहे.
महाबळेश्वर येथील पश्चिम घाटात बाराही महिने डोळ्याला दिपवणारं पाणी कोयना धरणमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोयना धारण हे पुणे शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.

Latest Posts

Don't Miss