आपल्या सर्वांना माहित आहे की दही हे दुग्धजन्य पदार्थ आहे आणि ते दुधापासून बनवले जाते. तथापि, vegan शाकाहारी समाजातील लोक जे सर्व प्रकारचे प्राणी आहार टाळतात, त्यांच्यासाठी अनेक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी शाकाहारी दही पाककृती आहेत, येथे आम्ही त्यापैकी 5 पाककृतींबद्दल चर्चा करणार आहोत.
सोया मिल्क दही:प्रथम सोया मिल्कला जास्त उकळी आणा आणि ते वारंवार ढवळत राहा. साखर घाला (पर्यायी). गॅस कमी करा आणि घट्ट दही तयार होण्यासाठी 5-6 मिनिटे उकळवा. आता दूध काही वेळ थंड होऊ द्या. दूध जरा गरम असताना त्यात विर्जनाकरिता विगन दही मिसळा. आता मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रात्रभर हे मिश्रण झाकून ठेवा.
टरबूज बियाणे आणि तांदूळ दही:
प्रथम भिजवलेल्या टरबुजांच्या आणि भिजवलेल्या तांदुळात नीट पाणी मिक्स करून बारीक वाटून घ्या. नंतर तांदूळ आणि टरबुजाच्या बियांपासून मिळालेले दूध एकत्र करून नीट गरम करून घ्या. दूध थोडे थंड झाले कि त्यात विर्जनाकरिता विगन दही मिसळा. आता मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रात्रभर हे मिश्रण झाकून ठेवा.
काजूचे दही:
प्रथम भिजवलेल्या काजूच्या आणि भिजवलेल्यातांड्या तांदुळात नीट पाणी मिक्स करून बारीक वाटून घ्या. नंतर काजू आणि तांदळाच्या बियांपासून मिळालेले दूध एकत्र करून नीट गरम करून घ्या. दूध थोडे थंड झाले कि त्यात विर्जनाकरिता विगन दही मिसळा. आता मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रात्रभर हे मिश्रण झाकून ठेवा.
नारळाच्या दुधाचे दही:
सर्वप्रथम, कॉर्न फ्लोअर ½ कप पाण्याने गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या. आता त्यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा.
नारळाचे दूध किंचित मध्यम आचेवर शिजवा आणि सुमारे 5 मिनिटे सतत ढवळत राहा दूध थोडे थंड झाले कि त्यात विर्जनाकरिता विगन दही मिसळा. आता मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रात्रभर सुमारे 6-8 तास हे मिश्रण झाकून ठेवा.
काजू आणि शेंगदाण्याचे दही:
एका खोल तळाच्या सॉसपॅनमध्ये काजूचे दूध + शेंगदाण्याचे दूध एकत्र करा. वापरत असल्यास साखर घाला. वारंवार ढवळत असताना एक उकळी आणा. 4-5 मिनिटे उकळवा.आता हे मिश्रण काही मिनिटे थंड होऊ द्या. ते थोडेसे उबदार झाले की, त्यात विर्जनाकरिता विगन दही मिसळा. आता मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रात्रभर सुमारे 6-8 तास हे मिश्रण झाकून ठेवा.
हे ही वाचा:
श्रीलंकेने अदानी समूहाच्या दोन पवन ऊर्जा प्रकल्पांना तात्पुरती दिली मान्यता
VIDEO