पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं…

महाराष्ट्राच्या (Maharashtra) भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच पुणेकरांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Award) अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक (Tilak), फुले (Phule), चाफेकर (Chafekar) या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Award) पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नरेंद्र मोदीं यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय (Unforgettable) अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी (Responsibility) देखील वाढते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासीयांना समर्पित करतो.
ज्यांच्या नावात साक्षात गंगा (Ganga) नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा (Namami Ganga) या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे.
संकटकाळात भारताने वैज्ञानिकांवर (scientists) विश्वास दाखवला, मेड इन इंडिया (Made in India) लस (vaccine) बनवली. कोरोनाची (Corona) लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सावरकर तरूण होते त्यावेळीच टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली. त्यांची इच्छा होती, सावरकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. त्यानंतर इथे येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना बॅरिस्टर होण्यासाठी मदत केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

दोन विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटनं मोदींच्या हस्ते

Khupte Tithe Gupte, दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version