spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी

सकाळी सर्वच भागात विसर्जनासाठी बरेच घरगुती आणि सार्वजनिक गणपती निघाले आहेत. पुण्यात रस्त्यांवर विसर्जनासाठी विशेष प्रकारची सजावट, ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची आणि भव्यदिव्य रांगोळ्यांची पर्वणी आहे.

सर्व नागरिक पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणा देत उत्साहात आणि जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडले आहेत.
फुलांच्या पाकळ्या, गुलाल, रांगोळ्या यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश करून बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीच्या लोकांनी रांगोळी कला सादर केली आहे. या रांगोळी कलाकारीतून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या रांगोळ्यांसाठी तब्बल ३०० किलो रांगोळीचा वापर केला गेला आहे. तसेच जवळजवळ २५० कलाकारांनी यात सहभाग घेतला.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात १०० फूट लांबीची ही भव्यदिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध मार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून रांगोळी साकारून समाज प्रभोधनाचे कार्य करीत आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss