Radhika Marchant चे लग्न सोहळ्यातील घागऱ्यातील लूक तुम्ही पाहिले आहे का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्याची देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. त्यातच अंबानींची धाकटी सून म्हणजेच राधिका मर्चंटचे लग्नातले लूकही एका मागोमाग एक समोर येत आहेत.

राधिका मर्चंटने हळदीच्या लूकसाठी राधिकाने मोगऱ्याच्या अतिशय सुंदर दुपट्टा स्टाइल केला आहे. हा सुंदर डिझायनर लूक अनामिक खन्ना यांनी डिझाईन केला आहे. या लूकमध्ये खऱ्या फुलांपासून बनवलेल्या दागिन्यांची स्टाइल करण्यात आली आहे.
राधिका मर्चंटसाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली एक सुंदर साडी पूजा आणि इतर कार्यांसाठी स्टाइल करण्यात आली आहे. याशिवाय राधिकाच्या मल्टी कलर लेहेंग्यातही लूक समोर आला आहे.
राधिका मर्चंटचा वधूच्या लूकसाठी राधिकाने हा सुंदर ऑफ व्हाईट आणि लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या खास प्रसंगी राधिकाने डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी खास गरबा रात्रीचे आयोजन केले होते त्यावेळी हे फोटो काढण्यात आले आहेत.
राधिकाच्या हा घागरा लूक मनीष मल्होत्राने सुंदर बांधणी घागरा डिझाइन केला आहे. बंधेज तयार करण्यासाठी एकूण ३५ मीटर कापड करण्यात आले आहे. दुपट्ट्याच्या बॉर्डरवर देवी दुर्गेची रचना करण्यात आली आहे. बांधणी प्रिंट घागरा लूक तयार करण्यासाठी जर्दोसीवर सोन्याच्या तारेने काम केले आहे.
शुभ आशीर्वाद कार्यक्रमासाठी राधिकाने हॅन्ड पेंटेड लेहेंगा निवडण्याचा अतिशय उत्तम निर्णय घेतला. हा लेहेंगा तीन डिझायनर अबू जानी, संदीप खोसला आणि समकालीन भारतीय कलाकार आणि मूर्तिकार जयश्री बर्मन यांच्या सहयोगाने विणला आहे.

Exit mobile version