spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raksha Bandhan Sweets: घरच्या घरी रक्षाबंधनाला मिठाई बनवा आणि या सणाला बनवा आणखी खास…

रक्षाबंधन हा सण बहीण भावाचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी आणि त्याची गोडी वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी भावाला राखी बांधण्यासोबतच काही गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून मिठाई खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्हाला हवी ती आणि हवी तशी मिठाई बनवू शकता.

मोतीचूर लाडू तुम्ही बाहेरून विकत आणून अनेक सणांना खात असाल. पण या रक्षाबंधनाला हा मोतीचूर लाडू घरीच बनवा आणि तुमच्या भावाला भरवा.
बेसनाची लाडू तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील पण काही वेगळे म्हणून या वेळी तुम्ही बेसनाची वडी नक्की ट्राय करून पहा.
बेसनाची लाडू तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील पण काही वेगळे म्हणून या वेळी तुम्ही बेसनाची वडी नक्की ट्राय करून पहा.
ड्रायफ्रुटस लाडू देखील या दिवशी तुम्ही बनवू शकता. हे लाडू आरोग्याला अतिशय पौष्टिक असतात.
नारळाचे लाडू हा पदार्थ सुद्धा तुम्ही बनवू शकता. यासाठी फार कमी साहित्य लागते आणि बनवण्यासाठीही अतिशय सोपे असतात.
दरवेळी तुम्ही अनेकदा तांदळाची खीर खात असाल पण या रक्षाबंधनाला तुम्ही शेवयांची खीर करू शकता. अगदी २० मिनिटात होईल तयार.
बऱ्याचदा साध्या बर्फी खाऊन कंटाळला असाल तर अंजीर बर्फी बनवून पहा ती अतिशय आरोग्याला पौष्टीक असते.

Latest Posts

Don't Miss