Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Samir Choughule Birthday: जाणून घ्या हास्यसम्राटाचा जीवनप्रवास

हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समीर चौघुले यांचा जन्म २९ जून, इ.स. १९७३ मुंबईमध्ये झाला.
मालिकापासून ते कॉमेडी शोपर्यंत, थिएटर नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत समीर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शोमध्ये काम केले आहे. ते सध्या प्रसारित होत असलेल्या “महाराष्ट्राची हस्यजत्रा” मधील भूमिकेसाठी ओळखले जातात.
त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली.
२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कायद्याचं बोला या चित्रपटाने समीरला अभिनयाच्या विश्वास नवी ओळख निर्माण करून दिली.
समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने मोठा पडदा देखील गाजवला आहे. ‘मुंबई मेरी जान’, ‘आजचा दिवस माझा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’, ‘विकून टाक’ अशा चित्रपटांमध्ये तर,‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘आंबट-गोड’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कॉमेडीची बुलेट’, ‘कुंकू’, ‘आज के श्रीमान श्रीमती’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा मालिकांमधून समीरने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर, समीर चौगुले यांनी रंगमंच देखील गाजवला आहे. ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘यदाकदाचित’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कॅरिऑन हेवन्स’, ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’ अशा काही नाटकांमधून देखील काम केलं आहे.
सध्या समीर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो मध्ये सक्रिय आहे. तर लवकरच त्याचा ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हा दीड तसंच एकपात्री र्योग् घेऊन समीर येत आहे.

 

समीरची मिमिक्री, टायमिंग, लिखाण यामुळे तो प्रेक्षकांचा आवडता आहे.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss